एक दिवस आधीच रिलीज होणार ‘दे दे प्यार दे’


आगामी ‘दे दे प्यार दे’ चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेता अजय देवगण प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. यात त्याच्यासोबत तब्बू आणि रकुल प्रीत या अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. दरम्यान चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे काही तास शिल्लक असतानाच आता प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला आहे.


१७ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण हा चित्रपट आता एक दिवस आधीच रिलीज केला जाणार आहे. हा चित्रपट १६ मे म्हणजे उद्याच चित्रपटगृहे गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. याबद्दलची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून दिली आहे.

भूषण कुमार, किशन कुमार आणि लव रंजन यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अजय आशिष नावाच्या ५० वर्षांच्या व्यक्तीचे पात्र साकारत आहे. तर रकुल आयशा नावाचे २६ वर्षाच्या तरूणीचे पात्र साकारत आहे. जी आशिषची गर्लफ्रेंड आहे. तर तब्बू अजयच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

Leave a Comment