माझ्या चित्रपटात करण-अर्जुन झळकावे – अली अब्बास जफर


सलमानच्या भारत या चित्रपटाचा दिग्दर्शक अली अब्बास जफरने नुकतेच एका मुलाखती दरम्यान सलमान आणि शाहरूख खानसोबत एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली असल्यामुळे बॉलिवूडच्या या दोन सुपरस्टारला एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते.

दिग्दर्शक अली अब्बास जफरने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हटले की, लवकरच शाहरूख आणि सलमान एकत्र काम करताना दिसू शकतात. लवकरच माझी ही इच्छा पूर्ण होवो, असे म्हणत आपल्याला यासाठी स्क्रीप्ट लिहावी लागेल, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

पुन्हा एकदा एकमेकांसोबत काम करण्याची शाहरूख आणि सलमानलादेखील इच्छा असल्यामुळे, एखादी चांगली स्क्रीप्ट यासाठी मिळताच ते स्क्रीन शेअर करताना दिसतील, असा विश्वासही अली अब्बास जफरने व्यक्त केला. दरम्यान शाहरूख आणि सलमानने याआधी ‘करण अर्जून’, ‘हम तुम्हारे हैं सनम’ आणि ‘कुछ कुछ होता हैं’ सारख्या सुपरहिटच चित्रपटांसाठी एकत्र काम केले आहे.

Leave a Comment