मिलींद सोमणच्या आईने ८० व्या वर्षीही केले पुश अप्स


मिलिंद सोमण याची तरूणाईचा फिटनेस आदर्श म्हणून ओळख असून मिलिंदने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगमधून केली होती. तो सोशल मीडियामध्ये नेहमी त्याच्या फिटनेसमुळे चर्चेत असतो. पण एका व्हिडिओद्वारे त्याच्या या फिटनेसमागचे रहस्य त्याने उलगडले आहे. त्याची आई उषा सोमण ही त्याच्यासाठी प्रेरणा आहे. त्याची आई ८० व्या वर्षीदेखील एकदम फिट आहे. त्याच्या आईसोबतचा एक व्हिडिओ मिलिंदने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्याची आई या व्हिडिओमध्ये पुश अप्स करताना दिसत आहे.

त्याने या व्हिडिओला कॅप्शन देताना, कधीही कोणत्याही गोष्टीसाठी खूप उशीर झालेला नसतो. उषा सोमण…माझी आई…८० वर्षांची तरुण… आपली आई आणि इतर सर्वांची काळजी घेते, पण अनेकदा स्वत:ची काळजी घेण्याकडे लक्ष देत नाही. आपल्या आईला तिच्या स्वत:साठी काही वेळ काढण्यासाठी प्रोत्साहित करा, प्रत्येक दिवसाला ‘मदर्स डे बनवा, म्हटले आहे.


सर्व मातांसाठी हा व्हिडिओ असून स्वत:साठी प्रत्येक आईने पाच मिनिटे, दहा मिनिटे तरी वेळ काढावा. आम्हाला सगळ्यांना तुम्हाला सुपरफिट पाहायचे आहे, असेही तो व्हिडिओत म्हणताना दिसत आहे. १२ मे रोजी जागतिक मातृत्व दिन होता. या दिवसानिमित्त अनेक कलाकारांनी आपल्या आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

Leave a Comment