आता कतरिनाचेही स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस


बुम या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये दाखल झालेली चिकनी चमेली अर्थात अभिनेत्री कतरिना कैफने हिंदी सिनेसृष्टीत आपले चांगले बस्तान बसवले आहे. त्यानंतर तिला आता सिनेनिर्मितीत देखील उतरायचे आहे. ती यासाठी चांगला आशय असलेली स्क्रिप्ट बनवण्यासाठी उत्सुक झाली आहे.

कतरिनाने आपल्या मनात सुरू असलेल्या सिनेनिर्मितीचा ‘वूट्स’च्या ‘फिट अप विथ द स्टार सिझन २’ च्या एपिसोडसाठी आली असताना उल्लेख केला. कतरिनाला आगामी काळातील योजनेबद्दल शोची होस्ट अनिता श्रॉफ अडजानियाने विचारले असता तिने निर्माती होणार असल्याचे सांगितले.

कतरिना म्हणाली, आशय विस्तार करण्यात मी गुंतली आहे.मला निर्माती व्हायचे असून माझ्या मालकीची निर्मिती संस्था उभारायची आहे. अनुष्का शर्मा आणि दीपिका पादुकोण यांनी प्रॉडक्शन हाऊस निर्माण केल्याबद्दल कतरिनाने त्यांचे अभिनंदन केले. सध्या सलमान खानसोबत भारत या चित्रपटात कतरिना भूमिका साकारत आहे. याचे दिग्दर्शक अली अब्बास जफर असून ‘ऑडे टू माय फादर’ या कोरियन चित्रपटाचा हा हिंदी रिमेक असेल. कतरिना याचबरोबर रोहित शेट्टी यांच्या आगामी ‘सुर्यवंशी’ या चित्रपटातही झळकणार आहे.

Leave a Comment