आमिर-सलमानपेक्षा जास्त संपत्तीचा मालक आहे ‘हा’ सुपरस्टार


टॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यापैकी दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा सुपरस्टार चिरंजीवी यांचा मुलगा रामचरण हा एक आहे. त्याने आपल्या सिनेकरिअरला 2007 मध्ये ‘चिरुथा’ या चित्रपटाद्वारे सुरुवात केली होती. रामचरणचा अगदी काही वर्षातच स्वतःचा असा चाहता वर्ग तयार झाला आहे, त्याच्यासाठी जो वाट्टेल ते करू शकतो. तो चित्रपटांशिवाय ब्रँड एण्डोर्समेन्ट आणि पर्सनल इनव्हेसमेन्टमधून पैसे कमावणारा राम चरणचा हैदराबादमध्ये जुबली हिल्स या मोक्याच्या ठिकाणावर आलिशान व्हिला आहे. ३८ कोटी रुपये एवढी या व्हिलाची किमान किंमत आहे.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कोणत्याही सेलिब्रिटींपेक्षा रामचरणचे घर हे महागडे आहे. कोनिडेला नावाचे रामचरणचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊसही आहे. दोन तमिळ चित्रपटांची निर्मितीही रामचरणने केली आहे. तसेच ‘तुफान’ या तमिळ चित्रपटासाठी गाणेही गायले आहे. चक्क चिरंजीवी त्याची निर्मिती असलेल्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे. तेलगू, तमिळ आणि हिंदी भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

1250 कोटी रुपये रामचरणचे नेटवर्थ आहे. याशिवाय त्याचे वार्षिक उत्पन्न 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. रामचरण हैदराबाद येथील ट्रू जेट या एअरलाइन्सचा मालक आहे. हे कमी की काय त्याची रामचरण हैदराबादर पोलो रायझिंक क्लब नावावरून पोलोच्या टीमचा मालक आहे. त्याच्याकडे बीएमडब्ल्यू, मर्सिडीज, रेंज रोवरशिवाय अनेक महागड्या गाड्या आहेत.

14 जून 2012 मध्ये रामचरणने अपोलो हॉस्पिटलचे एग्झिक्युटीव्ह चेअरमन प्रताप सी. रेड्डी यांची नात उपासना कमिनेनीशी लग्न केले. दाक्षिणाच्य अभिनेता अशी जरी रामचरणची ओळख असली तरी त्याने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. लवकरच बाहुबलीचे दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटात रामचरण काम करणार आहे. ज्युनिअर एनटीआरही या चित्रपटात असणार आहे. तसेच सलमान खानच्या भारत चित्रपटातही रामचरणची भूमिका असल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment