जेफ बेजोसनी केले पहिल्या मून मिशनचे उद्घाटन


अमेझोनचे सीइओ जेफ बेजोस यांनी शुक्रवारी पहिल्या मून मिशनचे उद्घाटन केले. त्यात ब्ल्यू ओरिजिन स्पेस प्रोग्रामखाली तयार केलेले नवे रॉकेट इंजिन व यान त्यांनी सादर केले. यावेळी बोलताना त्यांनी चंद्रावर परत जाण्याची वेळ आली असल्याचे सांगून अंतराळ मार्ग तयार करणार असल्याचे व अंतराळात राहण्याची सुविधा निर्माण करणार असल्याचे जाहीर केले.

सध्या जे मून लँडर बेजोस यांनी सादर केले आहे त्यातून फक्त वैज्ञानिक उपकरणे, सॅटेलाईट व रोवर हेच फक्त चंद्रावर पाठविता येणार आहेत. बेजोस म्हणाले, सध्या अंतराळात इन्फ्रास्ट्रक्चर नसल्याने काही करणे धाडसाचे आहे आणि ते महागही आहे. माझ्या पिढीचे काम इन्फ्रास्ट्रक्चर उभारणे आणि चंद्रावर जाण्याची सुविधा तयार करणे हे आहे. भविष्यात अंतराळ, चंद्र मानवी वस्तीसाठी तयार असतील आणि अंतराळ यात्रा स्वस्त व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. बेजोस यांनी यावेळी स्पेस कॉलनीचे फोटो दाखविले त्यात प्राणी आणि हिरवळ याचाही समावेश होता.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच २०२४ पर्यंत मानव पुन्हा चंद्रावर जाईल अशी घोषणा केली आहे. नासा आणि अनेक खासगी कंपन्या त्यासाठी काम करत आहेत. बेजोस यांच्या ब्ल्यू ओरीजीनला नासाचे सहकार्य आहे. बेजोस यांनी २०१६ मध्येच हा प्रकल्प सुरु केला असून स्पेस अँक्ट अॅग्रीमेंट खाली स्पेस प्रोग्रामसाठी नासाने बेजोस यांना ९१ कोटी रुपयांचे फंड दिले आहेत.

Leave a Comment