
जॅकलिन फर्नांडिस सलमान खानच्या आगामी किक चित्रपटाच्या सीक्वलमधून आऊट झाली असून तिची जागा आता दीपिका पादुकोणने घेतली आहे. दोघांची जोडी अशा प्रकारे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
अखेर सलमानसोबत स्क्रिन शेअर करणार दीपिका
किक चित्रपटाच्या सीक्वलची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून रंगत असते. या चित्रपटात जॅकलिन पुन्हा एकदा झळकणार अशी चर्चा होती. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात दीपिका महत्वाची भूमिका साकारणार आहे. ती यात केवळ लिड रोलमध्येच नाही तर सलमान सारखीच अॅक्शन करताना दिसणार असल्याची चर्चा आहे.
