‘पानिपत’च्या सेटवर परतला अर्जून


लवकरच ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ चित्रपटातून अभिनेता अर्जून कपूर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असणारा अर्जून आता आपल्या आगामी चित्रपटासाठी पुन्हा एकदा सेटवर परतला आहे.

तो आपल्या ‘पानिपत’ चित्रपटाच्या सेटवर परतला असून त्याने याबद्दलची माहिती फोटो शेअर करत दिली आहे. अर्जूनने ‘बॅक टू पानिपत’ असे कॅप्शन देत ड्रेसिंग रूममधील आपला एक फोटो शेअर केला आहे. अर्जूनचा पानिपतमधील लूक या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.

‘पानिपत’च्या तिसऱ्या युद्धावर आधारित चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर करणार आहेत. यात अर्जुन कपूर सदाशिवराव भाऊ यांची भूमिका साकारणार आहे. अर्जून कपूरशिवाय या चित्रपटात संजय दत्त आणि क्रिती सेनॉनही मुख्य भूमिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.

Leave a Comment