आम आदमी पक्षासाठी स्वरा भास्कर आणि प्रकाश राज यांचा प्रचार


काही दिवसांपूर्वी बिहारमधील बेगूसुराई लोकसभा मतदार संघात कन्हैय्या कुमारचा प्रचार करताना स्वरा भास्कर दिसली होती. ती त्यानंतर आमराराम यांच्या प्रचारासाठी राजस्थानला पोहोचली होती. त्यानंतर ती दिल्लीतील आपचे उमेद्वार आतिशी मर्लेना यांच्या प्रचारात दिसली. तिने घरी स्वस्थ न बसता आता आपच्या आणखी उमेदवारांचा प्रचार करायचा ठरवला आहे.

ट्विटरवर स्वरा भास्करने लिहिले आहे, गुरुवारी ९ मे रोजी दिल्लीत परतणार असून दक्षिण दिल्लीतील राघव चढ्ढा यांचा प्रचार करणार आहे. संसदेत शिकल्या सवरलेल्या जागरुक राघवसारख्या युवकाला पोहोचवण्याची आपली जबाबदारी असून अशा प्रकारे आतिशी यांचा प्रचार केल्यानंतर स्वरा आता राघव चढ्ढा यांच्यासाठी मैदानात उतरणार आहे.

बंगळूरमधून अभिनेता प्रकाश राज अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी त्यांचा प्रचार संपल्यानंतर हातकणंगले मतदार संघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांचा त्यांनी प्रचार केला. ते त्यानंतर थेट बिहारमध्ये कन्हैय्याच्या प्रचाराला पोहोचले. तेथील प्रचारानंतर प्रकाश राज दिल्लीत आपच्या उमेदवारांचा प्रचार करीत आहेत.

जरी प्रगतशील विचारांच्या उमेदवारांचा प्रचार स्वरा आणि प्रकाश राज हे करीत असले तरी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांची काही कमी नाही. परंतु ट्रोलर्सवर कसा पलटवार करायचा हे दोघांनाही चांगलेच कळते. त्यामुळे ते बिनधास्तपणे आपले विचार मांडण्यात गुंतले आहेत.

Leave a Comment