
नवी दिल्ली – दिल्ली येथे बोलताना प्रियंका गांधींनी जनतेला दिलेल्या फसव्या आश्वासनांवर तुम्ही निवडणूक लढवून दाखवा, असे ‘ओपन चॅलेंज’ मोदींना दिले. तुम्हाला दिल्लीतील एक मुलगी खुले आव्हान देत आहे. जीएसटी, महिलांची सुरक्षा, तरुणांना दाखवलेली स्वप्ने आणि तुम्ही जी आश्वासने सगळ्या देशाला दिली त्यावर लढून दाखवा, असे प्रियंका यांनी तडफदारपणे म्हटले आहे.
निवडणुकीचे शेवटचे टप्पे फसव्या आश्वासनांवर लढून दाखवा – प्रियंका गांधी
लोकसभा निवडणुकीचे शेवटचे २ टप्पे बाकी असून ते तरी स्वबळावर लढून दाखवा. ज्या मुद्द्यांवर तुम्ही लोकांना फसवले आहे, तुम्ही त्या मुद्द्यांवर निवडणूक लढून दाखवा, असे आव्हान प्रियंका यांनी पंतप्रधान मोदींना दिले. शाळेचा अभ्यास न केलेल्या मुलांसारखी पंतप्रधान मोदींची अवस्था झाली आहे. शाळेत गेल्यावर त्यांना अभ्यास न करण्याचे कारण विचारले की, ते काय करू नेहरूंनी माझी वही घेतली, लपवून ठेवली. मी काय करू इंदिराजींनी मी अभ्यास केलेल्या कागदाची नाव करून पाण्यात बुडवली, अशी कारणे देत असल्याचे प्रियंका यांनी म्हटले आहे.
