
पुणे – सासवड येथील एका कार्यक्रमात समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना मारहाण झाल्याची घटना घडली असून पंडित मोडक, विवेक मोडक यांच्यासह ४० ते ४५ जणांविरोधात या प्रकरणी मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात मिलिंद एकबोटेंना मारहाण
मंगळवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास सासवड येथील झेंडेवाडीमध्ये हरिनाम सप्ताह निमित्त मिलिंद एकबोटे हे आले होते. एकबोटेंनी फेसबुकवर पंडित मोडका गोशाळा चालवितो आणि तोच गाड्या पकडतो, भ्रष्टाचार करतो, अशा स्वरूपाची पोस्ट लिहिली होती. मोडक आणि त्यांच्या ४० ते ४५ समर्थकांनी या रागातून एकबोटे यांच्यावर हल्ला केला. एकबोटे आणि त्यांच्या कार्यकत्यांना मोडक यांच्या समर्थकांनी लाथाबुक्क्या, दगड आणि मिरचीची पूड टाकून मारहाण केली. या प्रकरणी मिलिंद एकबोटे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या प्रकरणी पंडित मोडक, विवेक मोडक यांच्यासह ४० ते ४५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
