अदानी ग्रुपची ओडिशामधील चक्रीवादळग्रस्तांना २५ कोटींची मदत


भुवनेश्वर – ओडिशामधील फानी चक्रीवादळग्रस्तांना मदत म्हणून अदानी ग्रुप २५ कोटी रुपयांची मदत करणार असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे ही मदत सुपूर्त केली जाणार आहे. ओडिशाच्या पूर्वकिनारपट्टीलगतच्या भागांना शुक्रवारी फानी या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला होता.

ओडिशा मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी १० कोटी रुपये देण्याचे आयसीआयसीआय बँकेने जाहीर केले आहे. ओडिशामधील नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी अदानी ग्रुप सरकारला पूर्ण सहकार्य करेल, असे अदानी कंपनीने म्हटले आहे. मुख्यत: मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी आयसीआयसीआय बँक दान करणार आहे. तसेच जिल्हापातळीवरही मदत करणार असल्याचे बँकेने म्हटले आहे. तसेच गृहकर्ज, कार, वैयक्तिक अशा विविध कारणांसाठी कर्ज घेणाऱ्या ग्राहकांकडून उशीरा हप्ता मिळाला तरी त्यावर आयसीआयसीआय बँक दंड आकारणार नाही. तसेच क्रेडिट कार्डच्या हप्त्यावरही उशिरासाठी आकारण्यात येणारा दंडही आकारणार नसल्याचे बँकेने म्हटले आहे.

Leave a Comment