राहुल गांधींचा ‘चौकीदार चोर है’ प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात माफीनामा


नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज ‘चौकीदार चोर’ है या घोषणेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल चुकीच्या पद्धतीने सांगितल्याप्रकरणी न्यायालयाने खडसावल्यानंतर न्यायालयाची बिनशर्त माफी मागितल्यामुळे या वादावर आता पडदा पडला आहे.

काँग्रेसने निवडणूक प्रचारादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना चौकीदार चोर है अशी घोषणा दिली होती. दरम्यान, राफेलप्रकरणी यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले होते. पण राहुल गांधी यांनी न्यायालयाच्या या निकालाचा दाखला देताना न्यायालयानेही चौकीदार चोर असल्याचे मान्य केल्याचे म्हटले होते.

भाजपने राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. तसेच न्यायालयात राहुल यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने निकाल चुकीच्या पद्धतीने सांगितल्याप्रकरणी तंबी दिली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी आपण निवडणुकांच्या प्रचाराच्या गोंधळात हे वक्तव्य केले असल्याचे सांगत दोन वेळा चुकीबाबत केवळ खेद व्यक्त केला होता. मात्र, आज राहुल गांधींच्या वकिलांनी त्यांच्यावतीने बिनिशर्त माफी मागितली.

Leave a Comment