आता ‘ड्रिम गर्ल’ बनून तुमच्या मनोरंजनासाठी येत आहे आयुष्मान खुराणा


अभिनेता आयुष्मान खुराणा ‘बधाई हो’ आणि ‘अंधाधून’ या चित्रपटांना मिळालेल्या अफलातून यशानंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर कथा चांगली असेल, तर अल्प बजेट चित्रपटही दमदार यश मिळवू शकतात, हे आयुष्मानने सिद्ध केले आहे. आता पुन्हा एकदा तो ‘ड्रिम गर्ल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आयुष्मान दिग्दर्शक राज शांडिल्य यांच्या ‘ड्रिम गर्ल’ चित्रपटात चक्क स्त्रियांच्या भूमिकेत झळकणार आहे. तो राधा, सीता आणि द्रोपदीच्या भूमिकेत या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक राज यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले होते, की मी या चित्रपटाच्या कथानकाबद्दल फार काही सांगू शकत नाही. पण, चित्रपटाच्या पोस्टरवरून चाहत्यांना कथेचा अंदाज लावता येऊ शकेल. या चित्रपटात आयुष्मान रामायणाची सीता, महाभारताची द्रोपदी आणि क्रिश्न लीलामधील राधेच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

एका माध्यमाच्या मुलाखतीत आयुष्माननेही सांगितले होते, की ‘ड्रिम गर्ल’ ही एक युनिक कथा आहे. मला या चित्रपटात साडी घालायला मिळणार असल्यामुळे या चित्रपटाबाबत खूप उत्साही असल्याचे तो म्हणाला होता. आयुष्मानसोबत या चित्रपटात नुसरत भरुचा आणि मनज्योत सिंग हे कलाकारही भूमिका साकारणार आहेत. दिग्दर्शक राज यांचा ‘ड्रिम गर्ल’ हा चित्रपट दिग्दर्शनात पदार्पणीय चित्रपट असल्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे.

Leave a Comment