‘सडक-२’ मध्ये आलिया साकारणार ‘ही’ भूमिका


बायोपिकनंतर बी-टाऊनमध्ये आता चित्रपटांच्या सिक्वलचाही ट्रेण्ड सुरू झाला आहे. आपला गाजलेल्या ‘सडक’ या चित्रपटाचा सिक्वल दिग्दर्शक महेश भट्ट हे बनवणार आहेत. या चित्रपटाचा तब्बल २७ वर्षानंतर सिक्वल बनणार असल्यामुळे चाहत्यांनाही या चित्रपटाबद्दल उत्सुकता आहे. आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त आणि पुजा भट्ट हे चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण त्यातच आता या चित्रपटात आलियाच्या व्यक्तिरेखेबाबत खुलासा करण्यात आला आहे.

कलाकारांच्या भूमिकेवरून महेश भट्ट यांनी पडदा उठवला आहे. आलियाच्या भूमिकेविषयी त्यांनी सांगितले, की या चित्रपटात आलिया भोंदु बाबाविरोधात लढताना दिसणार आहे. संजय दत्त तिला तिच्या या कामासाठी मदत करणार आहे. म्हणजेच आलियाचे पात्र हे १९९२ मधील ‘सडक’मध्ये संजय दत्तने जशी भूमिका साकारली होती, त्याचप्रकारची असणार आहे.

महेश भट्ट हे ‘सडक’च्या सिक्वेलच्या निमित्ताने तब्बल २३ वर्षानंतर दिग्दर्शनाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. तर, त्यांच्या दिग्दर्शनाखाली आलिया पहिल्यांदाच भूमिका साकारणार आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, चित्रपटाचे पहिले शेड्यूल हे १५ मे पासून मेहबूब स्टुडिओ येथे सुरू होणार आहे. येथे संजय दत्त आणि आलिया सोबत शूटिंग सुरू करतील. यापूर्वी या चित्रपटाचे शूटिंग रोमानिया येथे होणार, असे बोलले जात होते. मात्र, मुंबईतूनच शूटिंग सुरू होणार असल्याचे महेश भट्ट यांनी सांगितले आहे.

Leave a Comment