
आगामी ‘इंग्लिश मीडियम’मध्ये पोलिसाची भूमिका करिना कपूर साकारणार आहे. करिनाची ‘हिंदी मीडियम’ या गाजलेल्या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. यात इराफान खानसह राधिका मदन व्यक्तीरेखा साकारत आहेत.
इरफानसोबत ‘इंग्लिश मीडियम’मध्ये अनोख्या भूमिकेत झळकणार करिना
‘चंपक’ ही व्यक्तीरेखा इरफान खान यामध्ये साकारत आहे. मिठाईचे त्याचे दुकान असते. इरफानच्या भावाची भूमिका दीपक डोब्रियाल करीत असून त्याच्या चुलत बहिणीची भूमिका मनू ऋषी करीत आहे. मिठाईचे दुकान तिघेही चालवीत असतात पण एकमेकांचे शत्रू असतात. ‘इंग्लिश मीडियम’चे शूटींग उदयपूरमध्ये सुरू झाले असून लंडनमध्येही शूटींग होणार आहे.
करिना ‘इंग्लिश मीडियम’शिवाय करण जोहरच्या ‘तख्त’ या पिरियड ड्रामामध्ये काम करीत आहे. रणवीर सिंग, विकी कौशल, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अनिल कपूर आणि भूमी पेडणेकर यात मुख्य भूमिकेत आहेत.
