१९ मे पर्यंत प्रदर्शित होणार नाही ‘पी.एम. मोदी’


गेल्या अनेक दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित पी. एम. मोदी बायोपिकच्या प्रदर्शनाबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनेकदा पुढे ढकलली गेली. शेवटी या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपविण्यात आला होता. निवडणूक आयोगानेही अखेर हा चित्रपट १९ मे पर्यंत प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘पी.एम. मोदी’ या बायोपिकची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. मात्र, या चित्रपटाचे निवडणुकीच्या धामधुमीत प्रदर्शन रोखले गेले. हा चित्रपट एप्रिल महिन्यातच प्रदर्शित केला जाणार होता. पण, हा चित्रपट आता १९ मे नंतर प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे.

Leave a Comment