भन्साळींच्या ‘या’ चित्रपटात पोलिस अधिकारी बनणार रणदीप हुडा


संजय लीला भन्साळींच्या आगामी मिस्ट्री थ्रिलरमध्ये अभिनेता रणदीप हुडा मुख्य भूमिका साकारणार असून तीन चित्रपटांची निर्मिती भन्साळी प्रॉडक्शनच्यावतीने केली जाणार आहे. विनोदी ढंगाचा रणदीप काम करणार असलेला हा मिस्ट्री थ्रिलर असल्याचे सांगितले जाते. रणदीप या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असल्याचे समजते. नवोदित दिग्दर्शक बलविंदर सिंग जानूजा याचे दिग्दर्शन करणार आहेत.

सध्या लव्ह आज कलच्या सीक्वलमध्ये रणदीप हुडा काम करत असून कार्तिक आर्यन आणि सारा अली खान यांच्या यात भूमिका आहेत. एक हॉलिवूड चित्रपटदेखील रणदीपच्या हातात आहे. संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटांची शीर्षके ठरली आहेत. पूनम धिल्लनचा मुलगा अनमोल ठाकेरिया आणि जातलेका मल्होत्रा ‘ट्यूसडे अँड फ्रायडे’ या चित्रपटात काम करीत असून बॉलिवूडमध्ये जावेद जाफरीचा मुलगा मिझान आणि भन्साळींची भाची शर्मिन सैगल पदार्पण करणार आहेत. बालाकोट एअर स्ट्राईकवर आधारित भन्साळींचा दुसरा चित्रपट असेल.

Leave a Comment