
मुंबई : आपण कधीही नवा स्मार्टफोन घेतला की त्याच्यासोबत आपल्याला वॉरंटी मिळेत. ती यासाठी जर फोनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला असेल तर तो परत घेण्याचा दावा कंपनी करते. पण जर तुमचा नवा फोन खराब झाला आणि त्याबदल्यात तुम्हाला 10 फोन दिले तर तुमच्या आनंदाला पारावार उरणार नाही. असेच काहीसे एका ग्राहकासोबत घडले आहे, त्या ग्राहकाने पिक्सल 3 हा मोबाईल खरेदी केला. पण त्या फोनमध्ये त्याला काही अडचणी आल्यामुळे गुगल कंपनीकडे त्याने पैसे परत देण्याची मागणी केली. पण या ग्राहकाला गुगलने त्या ऐवजी मोठी भेट दिली. ग्राहकाला एक दोन नव्हे तर चक्क 10 कंपनीने फोन दिले. पण ते ग्राहकाने घेतले नाही. ग्राहक पूर्ण पैसे परत करण्याची मागणी करत आहे.
ग्राहकाने पैसे रिफंड मागितले म्हणून गुगलने देऊ केले चक्क 10 फोन
Cheetohz नावाच्या ग्राहकाने रेडिट डॉट कॉमवर (www.reddit.com) वर दावा केला आहे की गुगलने खराब पिक्सेल 3 स्मार्टफोन परत केल्यावर केवळ 80 डॉलर (सुमारे ५,५०० रुपये) दिले आहेत आणि कंपनीने 10 नवीन पिक्सल-3 मोबाईल पाठवले आहेत. ग्राहकाने म्हटले की, त्याला हे 10 नवीन स्मार्टफोन नको आहेत. हे फोन तो परत करणार आहे. त्या ग्राहकाला गुगलकडून अशी अपेक्षा आहे की कंपनी सर्व पैसे परत करेल. गुगलने या सर्व प्रकरणात 10 स्मार्टफोन ग्राहकाकडून परत मागितले नाहीत. असेही काही अहवालात म्हटले आहे.
