सलमानच्या ‘भारत’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

salman-khan
नुकताच बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानच्या बहुप्रतीक्षित ‘भारत’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चाहत्यांमध्ये सुरुवातीपासूनच चित्रपटातील सलमानच्या विविध लूक्सची चर्चा होती, सलमानच्या जबरदस्त डायलॉग्जची त्याला जोड मिळाली आहे. चित्रपटात सलमानसोबत कतरिना कैफ, दिशा पटानी, तब्बू, सुनिल ग्रोव्हर मुख्य भूमिकेत दिसतील.

अली अब्बास जफरचं दिग्दर्शन असलेल्या ‘भारत’ चित्रपटाच्या ट्रेलरला अल्पावधीतच यूट्यूबवर लाखांच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत. या चित्रपटातील सलमानचे विविध लूक गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर शेअर केले जात होते. चित्रपटात सलमानच्या व्यक्तिरेखेचा 18 वर्षांच्या तरुणापासून 70 वर्षांच्या वृद्धापर्यंतचा प्रवास दिसेल. यामध्ये भारत देशाची बदलती स्थितीही दिसणार आहे.

सलमानसोबत कतरिनाच्या अनोख्या लूकचीही चर्चा आहे. ‘भारत’च्या ट्रेलरमध्ये मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही दिसत आहे. सोबतच जॅकी श्रॉफ, सुनिल ग्रोव्हर, सतीश कौशिक, नोरा फतेही हे कलाकारही दिसतील. सलमानसोबतच बहीण अल्विरा खान अग्निहोत्री, मेहुणा अतुल अग्निहोत्री, भूषण कुमारही चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ईद-उल-फित्रच्या मुहूर्तावर म्हणजेच 5 जून 2019 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment