आता इंटरनेटशिवायही ट्रान्सफर करा पैसे

bhim-app
मुंबई : मोबाईल फोनवरून पैसे ट्रान्सफर करण्यासाठी इंटरनेट कनेक्शन आवश्यक असते असे बऱ्याच लोकांना वाटते. पण आता तो जमाना गेला आहे. तुम्हाला आता इंटरनेट कनेक्शनशिवाय देखील पैसे ट्रान्सफर करता येणार आहे. तुम्हाला भीम अॅप अॅपच्या मदतीने पैसे ट्रान्सफर करणे सहज शक्य होणार आहे. असे करणे बँक खात्याशी जोडलेल्या मोबाईल फोनच्या मदतीने सोपे झाले आहे. आपल्याला त्यासाठी यूएसएसडी (USSD) आधारित मोबाईल बँकिंग वापरणे आवश्यक आहे.

भीम अॅप सोबत आता यूएसएसडी देखील अपग्रेड करण्यात आले आहे. आपल्याला एक स्मार्टफोन आणि त्यात भीम अॅप अॅप त्यासाठी डाउनलोड करावे लागेल. याशिवाय, भीम अॅप वर नोंदणी प्रक्रिया आपल्याला पूर्ण करावी लागेल. एकदा सिम कार्ड आणि स्मार्टफोन आपल्या बँक खात्याशी कनेक्ट झाल्यानंतर, आपण भीम अॅपच्या मदतीने पैसे ट्रान्सफर करू शकता.

जर इंटरनेट उपलब्ध असेल तर आपल्याला यूपीआय कोडच्या आधारवर व्यवहार करणे आवश्यक आहे. जर इंटरनेट उपलब्ध नसेल तर आपण यूएसएसडी आधारवर मोबाईल बँकिंगचा पर्याय निवडू शकता. यासाठी आपल्याला *99# डायल करण्याची आवश्यकता आहे. एक स्वागत स्क्रीन आपल्या फोनवर असेल ज्यात सात पर्याय आहेत – पैसे पाठवा(Senod Money), पैसे मागवा(Request Money), चेक बॅलन्स(Check Balance), माझे प्रोफाइल(My Profile), प्रलंबित विनंती(Pending Requests, व्यवहार(Transaction) आणि यूपीआय(UPI) पिन. या पर्यायांना निवडल्यानंतर मोबाईल नंबर, पेमेंट पत्ता, सेव्हिंग बेनिफिट किंवा आयएफएससी(IFSC) कोड आणि अकाउंट नंबरच्या सहाय्याने ट्रान्सफर केले जाऊ शकतात.

Leave a Comment