‘कलंक’ ठरला पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

kalank
दिग्गज स्टारकास्ट असलेला करण जोहरचा बहुप्रतिक्षीत ‘कलंक’ चित्रपट काल बॉक्स ऑफिसवर झळकला. या चित्रपटात आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दिक्षित, संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट झळकली. ‘कलंक’ हा चित्रपट टीजरपासून ते ट्रेलर आणि यातील भव्यदिव्य सेट्सपर्यंत चर्चेत असल्यामुळे ‘कलंक’ला पहिल्याच दिवशी दमदार ओपनिंग मिळाली आहे.

पहिल्याच दिवशी ‘कलंक’ चित्रपटाने २१.६० कोटींची कमाई केली आहे. वरुण धवन आणि आलिया भट्ट यांच्या आत्तापर्यंतच्या करिअरमधला पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे. तसेच ‘केसरी’, ‘गली बॉय’ आणि ‘टोटल धमाल’ या चित्रपटांनी पहिल्या दिवशी केलेल्या कमाईचा विक्रम या चित्रपटाने मोडला आहे.

या चित्रपटातील ‘नाजायज मोहब्बत का अंजाम अक्सर तबाही होता है….’, ‘मेरे पास खोने को कुछ है ही नही’, ‘कुछ रिश्ते कर्जों की तरह होते उन्हे निभाना नहीं चुकाना पडता है, हे संवाद ट्रेलर आणि टीझरमधून प्रेक्षकांची मने जिंकून गेले होते. या चित्रपटाचे कलाकारांनीही दमदार प्रमोशन केले होते. हा चित्रपट आता आठवड्याच्या शेवटपर्यंत प्रेक्षकांना आकर्षित करण्यात आणखी किती यशस्वी होतो, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Leave a Comment