‘बागी २’ चित्रपटात प्रतीक बब्बरने खलनायकाची भूमिका साकारली होती त्याच्या चाहत्यांना त्याचा हा अनोखा अंदाज खुप आवडला होता. आता तो पुन्हा एकदा खलनायकी पात्र साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. तो रजनीकांतच्या आगामी ‘दरबार’ या चित्रपटात खलनायकी भूमिका साकारणार आहे.
रजनीकांतच्या दरबारचा व्हिलन होणार प्रतीक बब्बर
मला अशा प्रकारच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळत आहे, हे माझे भाग्य आहे. माझ्यासाठी आणि सान्यासाठी हे वर्ष खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात खूप सकारात्मक ठरल्याचे प्रतीकने म्हटले आहे. रजनीकांत सर आणि ए आर मुर्गाडोस यांच्यासोबत काम करण्यासाठी मी उतावीळ झालो असल्याचेही तो म्हणाला. यापूर्वी प्रतीकने ‘कुसेलान’, ‘चंद्रमुखी’ आणि ‘शिवाजी’ या चित्रपटात रजनीकांतसोबत काम केले आहे. गेल्या आठवड्यात मुर्गाडोस यांनी दरबार तित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिध्द केला होता. रजनीकांतचा हा ‘दरबार’ चित्रपट २०२० च्या पोंगलला म्हणजेच मकर संक्रातीला रिलीज होणार आहे