
नवी दिल्ली – भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी मी ब्राम्हण असल्यामुळे नावासमोर ‘चौकीदार’ लिहू शकत नसल्याचे अजब वक्तव्य केले आहे. स्वामींनी हे वक्तव्य एका तमिळ वाहिनीला मुलाखत देताना केले आहे. टि्वटरवरील आपल्या अकाउंटमध्ये भाजपच्या अनेक नेत्यांनी नावासमोर ‘चौकीदार’ लिहिले आहे. स्वामी त्या पार्श्वभूमीवर बोलत होते.
मी ब्राह्मण असल्यामुळे नावसमोर ‘चौकीदार’ लिहू शकत नाही
मी ब्राह्मण असल्यामुळे मी माझ्या नावासमोर चौकीदार लिहू शकत नाही. ब्राह्मण कधीच चौकीदार होऊ शकत नसल्याचे स्वामी म्हणाले. सध्या सोशल मीडियावर स्वामींचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ब्राह्मण चौकीदार नसतो हे वास्तव असल्याचेही स्वामी म्हणाले. टि्वटरवरुन मै भी चौकीदार ही मोहिम पंतप्रधान मोदींनी सुरू केल्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी टि्वटरवर नावासमोर चौकीदार लिहिले होते.
