पुढच्या महिन्यात बाजारपेठेत दाखल होणार सॅमसंगचा पहिला 5 जी फोन

samsung
सेऊल – हुवाईनंतर आता दक्षिण कोरियाई मोबाईल उत्पादक कंपनी असलेली सॅमसंग देखील लवकरच आपला 5जी स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल करणार असल्याची घोषणा कंपनीने केली आहे. सर्वप्रथम दक्षिण कोरियाच्या बाजारपेठेत ५ एप्रिलला सॅमसंगचा ५ जी फोन हा दाखल होणार आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भारतीय मुल्यात सुमारे ९१ हजार ५०० रुपये एवढी ५ जी फोनची किंमत असणार आहे. दक्षिण कोरियाची नॅशनल रेडिओ रिसर्च एजन्सीने सोमवारी गॅलक्सी एस १० या ५ जी मॉडेलच्या सिग्नलची यशस्वी चाचणी घेतल्यानंतर दक्षिण कोरियाच्या बाजारपेठेत फोन दाखल करण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला. सॅमसंगच्या व्यावसायिक ५ जी सेवा घेण्यासाठी दक्षिण कोरियाच्या तीन मोबाईल कंपन्यांनी तयारी केली होती. अमेरिकेच्या व्हेरिझॉन कंपनीने मोटोरोला मोटो झेड ३ हा बाजारपेठेत येण्यापूर्वी एक आठवडाआधी सॅमसंगचा मोबाईल बाजारात येणार आहे.

Leave a Comment