काँग्रेस नेत्याशी संबंध; कर्नाटक विधानसभा अध्यक्षांचे वादग्रस्त उत्तर

karnatak
नवी दिल्ली – सध्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कर्नाटक विधानसभा अध्यक्ष केआर रमेश कुमार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रमेश कुमार यांना ज्येष्ठ काँग्रेस नेते के एच मुनियप्पा यांच्याशी संबंध असल्यासंबंधी विचारले असता त्यांनी मी पुरुषांसोबत झोपत नसल्याचे म्हटले आहे. मुनियप्पा यांनी 15 फेब्रुवारी रोजी आपण आणि रमेश कुमार हे पती, पत्नीप्रमाणे असून कोणत्याही प्रकारचा आमच्यामध्ये वाद नसल्याचे म्हटले होते. दरम्यान सर्वांना रमेश कुमार यांच्या वक्तव्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला असून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

रमेश कुमार यांनी एक महिन्याभरापुर्वीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, पुरुषांसोबत मी झोपत नाही आणि कोणासोबतही मी झोपत नाही. मला एक पत्नी असून मी गेल्या दहा वर्षांपासून विवाहित आहे. माझ्यासोबत झोपण्यात मुनियप्पा यांना रस असू शकतो, पण तशी कोणतीही माझी इच्छा नाही. त्याचबरोबर कोणाशीही माझे कोणतेच संबंध नसल्याचे म्हटले आहे.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीचे तिकीट मुनियप्पा यांना मिळू नये यासाठी हे वक्तव्य रमेश कुमार यांनी केले आहे. अनेकदा मुनियप्पा यांच्यावर त्यांनी उघड टीकाही केली आहे. दरम्यान लोकसभा तिकीट मिळावे यासाठी मुनियप्पा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे कोलार लोकसभा मतदारसंघतील पाचही आमदार मुनियप्पा यांना तिकीट मिळू नये यासाठी पक्षावर दबाव आणत असल्याची माहिती आहे.

Leave a Comment