एअरटेलमध्ये होणार डिश टिव्हीचे विलिनीकरण?

airtel
केवळ टेलिकॉम क्षेत्रापर्यंतच मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ मर्यादित राहिलेली नसून याबाबत इतर माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच रिलायन्स जिओ डीटएच सेवा प्रदान करण्याची योजना आखत असून जिओने यासाठी केबल कंपन्या उदाहरणार्थ हॅथवे, डाटाकॉम आणि डेनमध्ये मोठी हिस्सेदारी खरेदी केली आहे.

या क्षेत्रात रिलायन्सने पाऊल ठेवण्यापूर्वी इतर अन्य कंपन्यांनी त्यांची तयारी सुरू केल्याचे चित्र आहे. याबाबत इतर प्रसारमाध्यमांमधील रिपोर्ट्सनुसार एअरटेल डिजीटल टिव्ही डिश टिव्हीच्या अधिग्रहणाची तयारी करत आहे. त्याचबरोबर अशी देखील चर्चा आहे की पूर्वीपासूनच या कंपन्या जिओच्या प्लानला जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत आहेत. सध्या विलिनीकरणासंबंधीची बोलणी सुरुवातीच्या टप्प्यात आहे. जर असे घडते तर जिओला डीटीएचच्या क्षेत्रात मोठे आव्हान मिळणार.

सध्या मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार एअरटेल डिजीटल टिव्ही आणि डिश टिव्हीचे विलिनीकरण झाल्यानंतर खूप मोठे युनिट बनणार आहे. दोघांचे एकत्रीकरण झाले तर ही कंपनी जगातील सर्वात मोठी टीव्ही डिस्ट्रीब्युशन कंपनी बनणार. दोघांचे मिळून ३८ मिलियन वापरकर्ते होतील आणि या कंपनीचा डीटीएच बाजारातील ६१ टक्के हिस्सा असणार आहे.

Leave a Comment