
हुवाई या चीनी स्मार्टफोन कंपनीचा सबब्रांड ऑनरने त्यांचा नवा मिड रेंज स्मार्टफोन ऑनर १० आय रशियन बाजारात सादर केला आहे. या फोनला सेल्फी साठी ३२ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला असून हा फोन बाजारात कधी येणार आणि त्याची किंमत काय असेल याचा खुलासा केला गेलेला नाही.
ऑनरचा नवा मिडरेंज स्मार्टफोन ऑनर १० आय लाँच
या फोनला ६.२१ इंची फुल एचडी डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉच सह दिला गेला आहे. हा फोन तीन कलर मध्ये असून त्याला अँड्राईड ९.० पाय ओएस आहे. ४ जीबी रॅम, १२८ जीबी स्टोरेज असून रिअरला ट्रिपल कॅमेरा सेट आहे. त्यातील प्रायमरी कॅमेरा २४ एमपी तर दुसरा ८ एमपी आणि २ एमपीचचे अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आहे. फेस अनलॉक फिचर असून रिअर मध्ये फिंगरप्रिंट सेन्सर दिला गेला आहे.
