पाकिस्तानच्या राष्ट्रीय परेड मध्ये चीनी फायटर जे १० ची झलक

chinaj10
येत्या २३ मार्च रोजी पाकिस्तानात होत असलेल्या राष्ट्रीय परेड मध्ये प्रथमच चीनची फायटर जेट सहभागी होत आहेत. या परेडसाठी चीनची जे १० फायटर जेट पाकिस्तानात पोहोचली असल्याचे समजते. पीपल्स लिबरेशन आर्मी एअरफोर्सतर्फे ही विमाने परेड मध्ये सहभागी होत आहेत त्याचबरोबर चीनची एचजे ८ अँटी टँक मिसाईल तसेच एफएम -९० एअर डिफेन्स मिसाईल हि सामील होत आहेत. या परेड साठी मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद प्रमुख पाहुणे आहेत. पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आर्थिक मदतीसाठी मलेशियाचा नुकताच दौरा केला होता. चीन बरोबर या परेड मध्ये सौदी आणि तुर्कस्थान हे देशही सामील होत आहेत.

चीनी जे १० फायटर जेट हे लढाऊ विमान हलके मल्टीरोल लढाऊ विमान असून सर्व हवामानात ते उत्तम कामगिरी बजावू शकते. चीनने सहाव्या जनरेशनचे लढाऊ विमान २०३५ पर्यत तयार करण्यात येणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले असून ग्लोबल टाईम्स रिपोर्ट नुसार ही विमाने ड्रोन आणि कृत्रिम बुद्धीमत्ता क्षमता असलेली असतील. त्यावर लेझर आणि हायपरसोनिक हत्यारे वाहून नेण्याची सुविधा असेल.

Leave a Comment