हुंदाई आणि किया मोटर्सची ओला मध्ये ३० कोटी डॉलर गुंतवणूक

hyundai
ऑनलाईन टॅक्सी बुकिंग सेवा देणाऱ्या ओला मध्ये हुंदाई आणि किया मोटर्सनी ३० कोटी डॉलर्सची गुतंवणूक केली जात असल्याचे जाहीर केले असून हि गुंतवून प्रामुख्याने इ वाहन ताफा तयार करण्यासाठी केली जात आहे. मंगळवारी हुंदाईचे कार्यकारी उपाध्यक्ष इयुइसन चुंग या संदर्भात बोलताना म्हणाले, हुंदाई आणि किया मोटर्सने संयुक्त स्वरुपात ओला बरोबर हा त्रिपक्षीय करार केला असून जागतिक बाजारासाठी इ वाहन प्रणाली टॅक्सी सेवा विकसित करणे त्याचबरोबर चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा निराम्ना करणे या त्याचा उद्देश आहे.

हुंदाईच्या व्यवसाय रणनीतीसाठी भारत महत्वाचा असून ओला बरोबरच्या भागीदारीतून स्मार्ट वाहतूक सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यात वापरली जाणारी वाहने नवीन जनरेशनची असतील. त्यात युजर आणि चालक याच्या गरजेनुसार सुविध फिचर दिली जातील. तसेच स्थानिक गरजाही विचारात घेतल्या जातील. ओलाने २०२२ पर्यंत २० लाख नवे रोजगार निर्माण करण्यचे ध्येय ठेवले आहे. सध्या ओलाच्या प्लॅटफॉर्मवर १३ लाख भागीदार आहेत.

Leave a Comment