
चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी ओप्पोने त्याच्या इनोव्हेशन इव्हेंट २०१९ मध्ये १० एक्स ऑप्टीकल झूम कॅमेरा असलेला स्मार्टफोन सादर होण्याचे संकेत दिले असून या फोनचे नामकरण ओप्पो रेनो असे केले गेले आहे. या फोनची चर्चा बराच काळ सुरु आहे आणि तो मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस मध्येच लाँच केला जाईल असा अंदाज यापूर्वी वर्तविला गेला होता.
ओप्पो १० एक्स स्मार्टफोन ऑप्टीकल झूम कॅमेरयासह येणार
कंपनीने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पुढच्या महिन्यात हा फोन लाँच होण्याचे संकेत दिले आहेत. या फोनसाठी नवीन कॅमेरा तंत्र वापरले गेले आहे. त्यात पेरीस्कोपप्रमाणे ट्रिपल कॅमेरा सेटअप रिअरला असेल. त्यातील प्रायमरी कॅमेरा ४८ एमपी, दुसरा १२० डिग्री वाईड अँगल तर सर्वात खालचा टेलीफोटो लेन्स कॅमेरा असेल. अन्य फिचरमध्ये ५ जी नेटवर्क सपोर्ट, फुल एचडी प्लस डिस्प्ले, ८ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज, इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असतील. हा फोन प्रीमिअर रेंज मधील असेल असे समजते.
