सायकलने ऑफिसला जा, जादा कमाई करा

cycle
जगभरातील अनेक देश सायकल या दुचाकी वाहनाचा स्वीकार मोठ्या प्रमाणावर करू लागले असून त्यात युरोपीय देशांनी आघाडी घेतली आहे. अर्योग्यासाठी फायद्याची, वाहतूक समस्या कमी करणारी, प्रदूषण कमी करण्यास हातभार लावणारी आणि पेट्रोल डीझेलचा खर्च वाचविणारी अशी ही बहुउपयोगी सायकल काही देशात नोकरदार लोकांना जास्तीचे पैसे मिळविण्यास सहाय्यकारी ठरणार आहे.

नेदरलंड सरकारने जे नोकरदार ऑफिसला जाताना सायकलचा वापर करतील त्यांना दर किलोमीटर मागे ०.२२ डॉलर म्हणजे १६ रु. देऊ केले आहेत. नेदरलंड मध्ये तसेही सायकलींचे प्रमाण खूप असून तेथे लोकसंख्येपेक्षा अधिक सायकली आहेत. सरकारने तेथील सर्व कंपन्यांना सायकलवरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सायकल टू वर्क स्कीम लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

इंग्लंड, बेल्जियम या देशातही सायकलीचे प्रमाण मोठे असून तेथे सायकल खरेदी करणाऱ्याला करसवलत दिली जाते. या देशात सायकलचा वापर वाढल्याने त्यांचे पेट्रोल डीझेलवरील अवलंबित्व कमी झाले आहे. नेदरलंड सरकारने सायकलिंग साठी पायाभूत सुविधा पुरविल्या असून सायकलींसाठी वेगळे मार्ग आणि जागोजागी पुरेसे पार्किंग तसेच सुरक्षित सायकल स्टँड बनविले आहेत.

Leave a Comment