पेटीएम करून वाहन दंड भरण्याची सुविधा नोइडा मध्येही सुरु

challan
उत्तर प्रदेशातील नोईडा येथे आता वाहतून नियम उल्लंघन करणारे चालक त्यासाठीचा दंड पेटीएम करून भरू शकणार आहेत. या पूर्वी ही सुविधा महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगाना आणि पश्चिम बंगाल राज्यात काही शहरात सुरु झाली आहे.

या विषयी अधिक माहिती देताना पेटीएमचे सीओओ किरण वासिरेद्दी म्हणाले, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यावर वाहतूक पोलीस चालकाचे चलन काटतात म्हणजे त्यांनी केलेल्या गुन्हानुसार दंडाची पावती फाडतात. पेटीएम पेमेंट कंपनीने यासाठी खास सुविधा २०१७ मध्ये लाँच केली असून तिची व्याप्ती देशातील पाच राज्यात आहे. आता या यादीत उत्तरप्रदेशचा समावेश झाला असून या प्रकारची सुविधा देणारे नोईडा हे उत्तर प्रदेशातील पहिले शहर बनले आहे.

२०१७ मध्ये ही सुविधा उपलब्ध झाल्यावर आत्तापर्यंत २० लाख चलन देवघेव व्यवहार पेटीएमने यशस्वी केले असून आता ३० लाख व्यवहारांचे उद्दिष्ट ठेवले गेले असल्याचे समजते.

Leave a Comment