इस्लामाबाद – भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी पाकिस्तानामध्ये घुसून वीरपराक्रम गाजवला. त्यानंतर देशातील प्रत्येक नागरिकाने त्यांच्या पराक्रमाचे कौतुक केले. त्याचबरोबर आता त्यांचा चाहतावर्ग देखील वाढला आहे. त्यातच काहींनी त्यांच्या सारखी हेअर स्टाईल आणि मिश्यादेखील ठेवण्यास सुरुवात केली आहे. पण आता आम्ही जी बातमी तुम्हाला सांगणार आहोत. ती वाचून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. अभिनंदन वर्धमान यांचा चाहतवर्ग आता पाकिस्तानमध्ये देखील आहे. त्यातच भर म्हणून काय तर कराचीतील एका चहावाल्याने आपल्या चहाच्या टपरीवर चक्क अभिनंदन यांचा फोटो लावला आहे.
सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानच्या कराचीतील चहावाल्याचा हा फोटो आणि मेसेज व्हायरल झाला आहे. उर्दु भाषेत त्यामध्ये संदेश देऊन अभिनंदन यांच्या शौर्याचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर या चहावाल्याने आपल्या चहाच्या कॅंटींगचेही मार्केटींग केल्याचे दिसून येत आहे. या चहावाल्याने आपल्या चहाच्या टपरीवर ”एैसी चाय जो दुश्मन को भी, दोस्त बनाये” असा संदेश फलकावर लिहिला आहे. त्यामुळे लोकांनी एकत्र येऊन आप-आपसातील वाद मिटवून चहाने तोंड गोड करावे, असेच या चहावाल्याने सूचवले आहे.
Khan Tea Stall—Special tea that may even turn foe into friend—😎#abhinandan pic.twitter.com/vVRaC6ZTyf
— Rauf Klasra (@KlasraRauf) March 12, 2019
सोशल मीडियावर पाकिस्तानमधील या अनोख्या चहा स्टॉलचा फोटो व्हायरल झाला असून ट्विटरवर हा फोटो पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांतील नागरिकांकडून व्हायरल करण्यात आहे. विशेष म्हणजे या फोटोचे कौतुक करण्यात येत आहे.