नीक जोनासचे प्रियंकाला महागडे गिफ्ट

combo1
जोनास ब्रदर्सचा अल्बम ‘सकर’ जगभर गाजत असून जोनास ब्रदर्सचा हा अल्बम बिलबोर्ड हॉट १०० सॉन्गच्या चार्टमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. या अल्बमच्या यशाबद्दल प्रियंका-निकने सेलिब्रेशन केले आहे. त्यानिमित्ताने त्याने प्रियंकाला काळ्या रंगाची मर्सिडीज मेबॅक कार गिफ्ट केली आहे. प्रियंकाने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.


या संदर्भातील वृत्त ‘बिलबोर्ड डॉट कॉम’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार तीनही जोनस भावांचे ‘बर्निग अप’ हे गाणे याआधी २००८ मध्ये पाचव्या क्रमांकावर पोहचले होते. या महिन्याच्या सुरूवातीलाच ‘सकर’ हे गाणे रिलीज करण्यात आले होते. यात प्रियंकादेखील निकसोबत पाहायला मिळते. निकचे भाऊ केविन त्याची पत्नी डॅनियल आणि जो ‘गेम ऑफ थ्रोन्स’ची अभिनेत्री पत्नी सोफी टर्नरसह या अल्बममध्ये पाहायला मिळते.

Leave a Comment