
स्टारकिड असलेल्या सारा अली खानने केदारनाथ या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर आलेल्या रणवीर सिंहच्या सिम्बा चित्रपटात साकारलेल्या भूमिकेचे भरभरुन कौतूक झाले. या दोन्ही चित्रपटाच्या यशानंतर साराच्या झोळीत खूप चित्रपट पडले आहेत. त्यात शहीद उधम सिंग यांच्या बायोपिकचाही समावेश होता.
विकीसोबत स्क्रिन शेअर करण्यास साराचा नकार ?
या चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत झळकणार असून साराच्या नावाचा या चित्रपटाची मुख्य नायिका म्हणून विचार सुरु आहे. पण हा चित्रपट साराने नाकारल्याचे वृत्त आहे. अभिनेत्री म्हणून तिला या चित्रपट फार महत्व नसल्याचे म्हणत तिने हा चित्रपट नाकारला आहे. तर दुसरीकडे तिने ‘लव्ह आज कल २’ मुळे हा चित्रपट नाकारला असल्याचेही म्हटले जात आहे. अभिनेता कार्तिक आर्यनसोबत ‘लव्ह आज कल २’ मध्ये सारा अली खान काम करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अली करत आहेत.
