व्हिडीओ – उमर अकमल म्हणतो, पाकिस्तानमध्ये होणार पुढील आयपीएल

umar-akmal
याच महिन्यात क्रिकेटचा महाकुंभ अशी ओळख असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगची (आयपीएल) सुरुवात होणार असतानाच शेजारील पाकिस्तानात पीसीएल सुरु आहे. याचे काही सामने युएईमध्ये खेळवल्यानंतर आता उर्वरित सामने पाकिस्तानात खेळवण्यात येत आहेत. काही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूही पीएसएलच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळणार असल्याने सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून अनेक पाकिस्तानी खेळाडू या स्पर्धेची जाहिरात करताना दिसत आहे. पण सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानचा यष्टीरक्षक आणि कोटा ग्लॅडिएटर्स संघाचा खेळाडू उमर अकमलने अशीच एक जाहिरात करताना मोठा गोंधळ घातला आहे. यावरुनच तो आता ट्रोल होताना दिसत आहे.


अकलमाने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये त्याने पुढील आयपीएल पाकिस्तानमध्ये होईल असे वक्तव्य केले आहे. अकमल २० सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये म्हणतो, कोटाचा संघ कराचीला आला आहे. आमच्या घरच्या मैदानावर आम्ही खेळत असल्यामुळे आमच्या संघाला जेवढा पाठिंबा क्रिकेट चाहते देतील तितकी चांगली कामगिरी संघ करेल. प्रेक्षकांनी अशाप्रकारे प्रत्येक संघाला पाठिंबा दिला तर पुढील आयपीएल (अडखळून) सॉरी पीएसएल येथेच (पाकिस्तानमध्ये) होईल, असे म्हटले आहे.

Leave a Comment