आँटी म्हटल्याने जाम भडकली करिना

kareena-kapoor
सोशल मीडियावर बॉलीवूड सेलिब्रेटी ट्रोल होणे हे काही आता नवीन राहिलेले नाही. कोणत्या न कोणत्या कारणामुळे ते ट्रोल होतच असतात. त्यामुळे काही सेलिब्रेटी ट्रोल न होण्यासाठी त्या गावाला न जाणेच पसंत करतात. पण यातच आता अभिनेत्री करिना कपूर खान ट्रोलर्सच्या तावडीत सापडली.

लवकरच पिंच हा वेब शो घेऊन अरबाज खान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करिनाने देखील या शोमध्ये हजेरी लावली होती. सोशल मीडिया आणि ट्रोलर्स याबद्दल यावेळी कलाकार शोमध्ये बोलत होते. करिनाच्या एका फोटोवर आलेली ट्रोलरची कमेंट यावेळी वाचून दाखवण्यात आली.

या कमेंटमध्ये आता तू आँटी झाली आहेस, तरूण मुलींप्रमाणे वागणे सोडून दे, असे लिहिण्यात आले होते. ही कमेंट ऐकून सुरूवातीला करिना हसली. पण अवघ्या काही क्षणातच तिने यावर प्रतिक्रिया दिली. लोकांना वाटते की, कलाकार हे भावना शुन्य आहेत. ते कधीही कलाकारांच्या भावनांबद्दल विचार करत नाहीत त्यामुळे हे सर्वकाही सहन करावे लागते, असे म्हणत करिनाने याबद्दल खंत व्यक्त केली. या शोमध्ये करिनाशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकी, सोनाक्षी सिन्हा आणि कपिल शर्मासारख्या कलाकारांनीही हजेरी लावली.

Leave a Comment