कोणत्याही क्षणी होऊ शकते लोकसभा निवडणुकीची घोषणा

election
नवी दिल्ली – कोणत्याही क्षणी आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होऊ शकते. त्यासाठी लागणारी सर्व तयारी केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. त्यानुसार रविवार किंवा सोमवारपर्यंत निवडणुकांच्या तारखांची घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण मतदान प्रक्रिया जवळपास एप्रिल-मे महिन्याच्या कालावधीत पार पाडली जाऊ शकते.

१६व्या लोकसभेचा कार्यकाळ जून महिन्यात संपत आहे. किमान २ आठवडे आधी नवे सरकार बनण्यासाठी मतदानाची तारीख सुनिश्चित करणे आवश्यक आहे. ६ ते ७ टप्प्यामध्ये यावेळी निवडणुका होणार असल्याचे म्हटले जात आहे. पण हे तेव्हाच स्पष्ट होईल जेव्हा निवडणूक आयोग याची अधिकृत घोषणा करेल. तर, निवडणुकांच्या तारखांवर वेळोवेळी समोर येणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचेही आयोगाने आवाहन केले आहे.

संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांच्या वेळी सी-व्हिजिल अप्लिकेशन लॉन्च केले जाणार आहे. सामान्य मतदार या अप्लिकेशनच्या माध्यमातून निवडणुकीच्या संबंधात कोणतीही तक्रार तत्काळ निवडणूक आयोगाला करू शकेल. तक्रार कर्त्याचे नाव त्यामध्ये गुप्त ठेवले जाण्याचा पर्यायही असेल. निवडणूक आयोग त्या तक्रारींना स्वतःच्या खर्चाने वर्तमान पत्रांतून प्रसिद्ध ही करेल. समाज माध्यमांवर पाळत ठेवण्यासाठी आयोग आपल्या विविध समित्यांमध्ये एक-एक सोशल मीडिया तज्ज्ञ तैनात करणार आहे.

Leave a Comment