आयपीएलचे सायंकाळचे सामने ४ वाजता तर रात्रीचे सामने ८ वाजता

IPL
मुंबई – आयपीएल सामन्यांच्या वेळांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेली समिती सीओए निर्णय दिला असून सीओएने स्पष्ट केले, की आयपीएल स्पर्धेत सायंकाळचे सामने ४ वाजता तर रात्रीचे सामने ८ वाजता सुरू होतील.

आयपीएलमध्ये रात्री ८ वाजता सुरू होणाऱ्या सामन्यांची वेळ बदलून ७ वाजता करावी, यासाठी बीसीसीआयवर दबाव होता. अशी मागणी गेल्याकाही वर्षातही करण्यात येत होती. मुख्यत: प्रसारणकर्ते आणि काही संघमालकांमुळे ही मागणी करण्यात येत होती. बीसीसीआय आणि सीओएच्या यांच्यात सामन्यांच्या वेळेबाबत गुरुवारी बैठक घेण्यात आली. यावर अंतिम निर्णय देताना सीओएने स्पष्ट केले, की रात्री ८ वाजता यावर्षीही सामने सुरू होतील.

आयपीएलचे पहिल्या २ आठवड्यांचे वेळापत्रक जाहिर झाले असून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात पहिला सामना होणार आहे. लोकसभा निवडणुकांचा तारखा जाहिर झाल्यानंतर पूर्ण वेळापत्रक घोषित केले जाणार आहे. गेल्यावर्षी साखळी फेरीतील सामने ८ वाजता तर, प्लेऑफचे सामने ७ वाजता सुरू करण्यात आले होते.

Leave a Comment