तुम्ही फक्त आमचे विश्वचषकाचे यजमानपद काढूनच दाखवा – बीसीसीआय

BCCI
मुंबई – 2021ची टी-20 आणि 2023च्या एकदिवसीय विश्वचषकाचे यजमान पद भारताला हवे असल्यास त्यांनी करामध्ये सवलत द्यावी असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) त्रैमासिक बैठकीत बीसीसीआयला सांगितले होते. त्याचबरोबर करात बीसीसीआयने सुट दिली नाही तर, तुमच्याकडून विश्वचषकाचे यजमान पद काढून घेण्यात येईल असा इशारा दिला होता.

आता आयसीसीच्या इशाऱ्यावर बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रतिक्रिया दिली असून, ते म्हणाले, आयसीसीला आमच्याकडून विश्वचषकाचे यजमान पद काढून घ्यायचे असल्यास त्यांनी ते खुशाल काढून घ्यावे, त्यावर आम्ही काहीही हरकत घेणार नाही. कारण करमाफी ही सरकार देते बीसीसीआय नाही. तसेच अशाप्रकारच्या दबावात येवून आम्ही आयसीसीची मदत करू शकत नाही.

जर विश्वचषकाचे यजमान पद काढून आयसीसीने विश्वचषकाचे आयोजन दुसऱ्याठिकाणी केले तर आयसीसीला देण्यात येणारा कमाईचा वाटा बीसीसीआयही काढून घेईल. यानंतर आपण बघु कोणाचे किती जास्त नुकसान होते. प्रशासनात असलेले लोक कोणत्याही कायद्याशिवाय नियम बनवायला बघतात. आयसीसीच्या अशाप्रकारच्या निर्णय मान्य करणे बीसीसीआयला शक्य नाही. अशा गोष्टी बोर्डाच्या हद्दीत येत नाहीत.

आयसीसी सर्वांना सोबत घेवून जाण्याच्या गोष्टी करते. परंतु, भारताला नुकसान पोहचवायचा नेहमी त्यांचा प्रयत्न असतो. फक्त करात सुट मिळवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सांगितले जाते. परंतु, आम्हाला करात सुट मिळवलीच पाहिजे असे सांगितले जाते.

Leave a Comment