या मंडळींना घराच्या परिसरात सापडल्या अशाही वस्तू!

discovery
आपले आयुष्य अतिशय आरामदायक, ऐषारामी, वैभवसंपन्न असावे, नशीबाने आपल्याला सदैव साथ द्यावी, आपल्याकडे पैशांची कमतरता कधीही जाणवू नये अशी इच्छा प्रत्येकाची असते. आपली ही इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेकांची अपार कष्ट करण्याचीही तयारी असते, पण त्यांच्या कष्टांचे चीज होतेच असे नाही. मात्र या जगामध्ये काही भाग्यवान लोक असे ही आहेत, ज्यांना त्याच्या घरांच्या परिसरामध्ये अनेक वर्षे जुन्या अशा वस्तू अचानक सापडल्या आणि त्यामुळे अजिबात कष्ट करावे न लागता त्यांचे नशीबच बदलून गेले.
discovery1
अमेरिकेतील शिकागोमध्ये राहणाऱ्या वेन साबाज नामक ५१ वर्षांच्या गृहस्थाची नोकरी गेल्यानंतर आपली उपजीविका चालविण्यासाठी त्याने आपल्या घराच्या पाठीमागे असलेल्या छोट्याश्या अंगणामध्ये भाजीपाला, फळे पिकवायला सुरुवात केली. आपल्या लहानशा बागेमध्ये होणारी भाजी, फळे विकून वेनला थोडीफार कमाई होत असे. एक दिवस भाजी लावण्यासाठी जमिनीमध्ये चर खणीत असताना वेनला जमिनीमध्ये पुरलेले एक गाठोडे आढळले. हे गाठोडे कसले याचे आश्चर्य व्यक्त करीत वेनने ते सोडून पाहिले मात्र, आणि त्याच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. त्या गाठोड्यामध्ये चक्क नोटांची बंडले होती. वेनने पैसे मोजून पाहिल्यानंतर ही रक्कम तब्बल १५०,००० डॉलर्स इकी भरली. वेनने त्वरित आपल्या वडिलांना याबद्दल सूचना दिली. अचानक इतके पैसे आपल्या अंगणामध्ये आले कसे याचा विचार करून दोघेही अतिशय अस्वस्थ झाले.
discovery2
अंगणामध्ये अचानक सापडलेले हे पैसे चोरीचे असण्याची शक्यता होती, त्यामुळे या पैशांचा शोध घेताना पोलीस त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचले, तर वेन गोत्यात येण्याची शक्यता होती. त्यामुळे वेन आणि त्याच्या वडिलांनी आपण होऊन पोलिसांना सूचित करण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे त्यांनी अधिकाऱ्यांना सूचित केल्यानंतर पोलिसांनी ही रक्कम आपल्या ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरु केली असता, हे पैसे वेनच्या शेजारी राहणाऱ्या डेलोरिस जॉन्सन नामक महिलेचे असल्याचे निष्पन्न झाले. पण हे पैसे घरात आल्यानंतर डेलोरिसच्या घरामध्ये अनेक वाईट प्रसंग घडून आल्यामुळे हे पैसे अवलक्षणी आहेत असे समजून डेलोरिसने हे पैसे वेनच्या बागेमध्ये पुरले होते. डेलोरिसला जरी हे पैसे नकोसे झाले असले, तरी तिच्या मुलीला हे सर्व प्रकरण समजल्यानंतर तिने या पैशांवर आपला हक्क सांगितला. वाद सुरु झाले आणि प्रकरण कोर्टमध्ये पोहोचले. पण यावर निर्णय होण्याआधीच वेनचा मृत्यू झाला. अखेरीस वेनचा मुलगा आणि डेलोरिसची मुलगी या दोघांनी मिळून आपसात समजुतीने भांडणे मिटविण्याचा निर्णय घेत ही रक्कम निम्मी-निम्मी वाटून घेतली.
discovery3
२०१३ साली जॉन आणि मेरी हे दाम्पत्य आपल्या घरामागील अंगणामध्ये आपल्या पाळीव कुत्र्याला फिरवत असताना त्यांना अंगणामध्ये एके ठिकाणी एक जुन्या डब्यासारखी वस्तू अर्धवट पुरलेली आढळली. हा डबा उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये एक हजार सुवर्णमुद्रा असल्याचे मेरी आणि जॉनला दिसून आले. या डब्यामध्ये आढळलेल्या सुवर्णमुद्रा अतिशय मौल्यवान हे लक्षात येताच या दाम्पत्याने डॉन कागीन नामक इतिहासकाराशी त्वरित संपर्क साधला. कागीन यांनी केलेल्या संशोधनातून त्या मुद्रा १८४७ ते १८९४ सालच्या दरम्यानच्या असल्याचे स्पष्ट झाले. या सुवर्णमुद्रांची किंमत अकरा मिलियन डॉलर्स इतकी भरली. मेरी आणि जॉनने यातील अनेक मुद्रा उत्तम किंमतीला विकल्या असून, यांपैकी काही मुद्रा आपल्या संग्रही जपून ठेवल्या आहेत.

Leave a Comment