आगळे-वेगळे फास्ट फूड रेस्टॉरंट सुरु करुन झाले सात हजार कोटींचे मालक

sweetgreen3
आपल्यामध्ये काही करण्याची जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असेच काहीतरी वाशिंग्टनमधील जॉर्जटाउन विश्व विद्यापिठामध्ये शिक्षण घेणाऱ्या तिघा मित्रांनी करुन दाखवले आहे. निकोलस जामेट, जोनाथन नेमान आणि नथानिएल या तिघांच्या मनात एखादे आगळे-वेगळे रेस्टॉरंट सुरु करण्याची भन्नाट कल्पना आली. त्यानुसार त्यांनी 2006 साली एक हेल्दी फास्ट फूड रेस्टॉरंट सुरु केले. त्यावेळी त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये फक्त सलाड विकले जात असे. त्यानंतर 12 वर्षांनंतर हे तिघे आजमिती सात हजार कोटी रुपयांचे मालक बनले आहेत.
sweetgreen
आजच्या तरुणाईला जंक फूड किती आवडते हे तुम्हाला काही नव्याने सांगायची गरज नाही. पण हे तिघे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जंक फूड टाळत होते. त्यांना जंक फूड खाल्ल्यानंतर आपल्या शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांची देखील कल्पना होती. त्याकाळी मुबलक दरांमध्ये उपलब्ध असणारे हेल्दी फास्ट फूड रेस्टॉरंट शहरात एकही नव्हते. त्याच दरम्यान त्यांच्या डोक्यात एक आगळे-वेगळे रेस्टॉरंट सुरु करण्याची कल्पना आली. त्यांनी त्यावेळी जॉर्जटाउन येथे बंद पडलेल्या एका पबमध्ये त्यांनी रेस्टॉरंटमध्ये सुरू केले. त्यांनी या रेस्टॉरंटमध्ये विक्रीसाठी फक्त सलाड ठेवले होते.
sweetgreen1
मित्र आणि कुटुंबातील परिवाराच्या मदतीने त्यांनी काही महिन्यातच दोन कोटी रूपये जमा केले. तिघांनी मिळून ऑगस्ट २००७ मध्ये स्वीटग्रीन नावाने हेल्दी फास्ट फूड रेस्टॉरंटची सुरूवात केली. त्यांनी रेस्टॉरंटमध्ये काम करण्यासाठी विद्यार्थ्यांना नेमले. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन या तिघांनी रेस्टॉरंटची जाहीरात केली. या हटके रेस्टॉरंटची त्यांनी वेबसाईटदेखील तयार केली. जोनाथनला याबद्दल विचारले असता ते सांगतात की, आपल्या स्वास्थविषयी लोकांमध्ये जागरूकता वाढत गेली आणि आमच्या रेस्टॉरंटबाहेर रांगा लागल्या. आमचे रेस्टॉरंट लवकरच लोकप्रिय झाले.
sweetgreen2
स्वीटग्रीन रेस्टॉरंट अल्पवधीतच लोकप्रिय झाले. एका रेस्टॉरंटमुळे आम्ही लोकांची मागणी पूर्ण करण्यात लवकरच अयशस्वी ठरू लागलो. आम्ही त्यानंतर स्वीटग्रीन रेस्टॉरंटची दुसरी शाखा वॉशिंगटनमध्ये उघडली. त्यासाठी हवी असणारी रक्कम उद्योगपती वॉल्टर रॉब, स्टीव केस आणि फ्रान्समधील प्रसिद्ध शेफ डेनिएल बोलुद यांच्याकडून उपलब्ध झाली. सध्या अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांमध्ये स्वीटग्रीन रेस्टॉरंटच्या ९० शाखा आहे. लवकरच आणखी २० शाखा सुरू करण्यात येणार आहेत. स्वीटग्रीन रेस्टॉरंटमध्ये फक्त फळ आणि भाज्यांपासून बनवलेले पदार्थ उपलब्ध आहेत. फळ आणि भाज्या फक्त अमेरिकेतील शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जातात.

Leave a Comment