हे विनादुकानदार दुकान चालते ग्राहकांच्या भरवश्यावर - Majha Paper

हे विनादुकानदार दुकान चालते ग्राहकांच्या भरवश्यावर

shop
सर्व सामान्यतः आपण कोणतेही दुकानात गेल्यावर तेथील गल्ल्यावर दुकानाचा मालक बसलेले असतो. पण तुम्ही असा विचार करा की आपण खरेदीला गेलो आणि तेथे जर दुकानदारच नसेल तर… आपली चंगळच होईल ना! पण आपल्या देशातील एका राज्यात एक असे दुकान आहे जे दुकानदारविना अर्थात ग्राहकांच्या भरवश्यावर चालते. हे केरळ राज्यातील कन्नूरजवळील एका गावात आहे.
shop1
हे दुकान कन्नूरजवळील अझीकोड गावांमध्ये दिव्यांगांनी सुरू केले आहे. दिव्यांग जनशक्ती ट्रस्टच्या मदतीने एक जानेवारी २०१९ रोजी या दुकानाचा शुभारंभ झाला. दुकानामध्ये सामानाच्या विक्रीसाठी कोणीही नाही. येथे लोक येतात सामान घेतात, त्यानंतर आपण घेतलेल्या सामानाची किंमत ते दुकानात ठेवलेल्या पेटीत टाकतात. तसेच या दुकानाची देखरेख शेजारीच असलेल्या अन्य दुकानांचे दुकानदार करतात. दुकानामधील सर्व सामान दिव्यांनी तयार केले आहे. या दुकानातील सामान तयार करणारे सर्वजण दिव्यांग जनशक्ती ट्रस्टशी जोडले गेलेले आहेत. आसपासचे लोक सकाळी सहा वाजता दुकान उघडतात आणि संध्याकाळी १० वाजता बंद करतात.
shop2
या दुकानात दररोज वापरात येणारे सामान विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. या दुकानातून मिळाणारी रक्कम ट्रस्टला दिली जाते. दुकानासमोर एक बोर्ड लावण्यात आला आहे. या दुकानात कोणीही नाही, तुम्हाला हवे ते सामान खरेदी करा. सामानावर लिहण्यात आलेली किंमत येथे ठेवण्यात आलेल्या बॉक्समध्ये टाकावी. खरेदीसाठी येणारे लोक प्रमाणिकपणे पैसे देऊन सामान खरेदी करतात. सोशल मीडियावर सध्या या दुकानाची चर्चा सुरू आहे. नेटीझन्सकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Leave a Comment