ब्राझीलमध्ये आढळला ३६ फूट लांबीचा समुद्री हम्पबॅक व्हेल

whale
रिओ दी जनेरियो – मागील आठवड्यात ब्राझीलमधील अॅमेझॉनच्या जंगलात ३६ फूट लांबीचा समुद्री हम्पबॅक व्हेल मृतावस्थेत आढळला. व्हेल नदी सोडून १० टन वजनाचा जंगलात आला कसा? हे एक कोडेच बनले आहे. नदीतच त्याचा मृत्यू झाला असावा आणि हायटाइडमुळे नदीतून वाहून येथे आला असावा, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. मृत्यूचे कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. ब्राझीलच्या माराजो बेटावर हा हमबॅक व्हेल मृतावस्थेत सापडला. अॅमेझॉन नदीच्या उगमावर हे ठिकाण आहे. या जागेचे अंतर नदीपासून १५ मीटर एवढे आहे. या व्हेल माशास आम्ही खूपदा नदीत पाहिले आहे, असा येथील नागरिकांचा दावा आहे.
whale1
दरम्यान याचा शोध ओशनोग्राफर मॉरा सॉरा हिने लावला आहे. दक्षिण अटलांटिकमध्ये आढळणाऱ्या व्हेल या साधारण वीणीच्या हंगामात ब्राझीलच्या दिशेने येतात. पण हे उत्तर अटलांटिकमध्ये आढळणारे व्हेल असू शकते . हे व्हेलचे पिल्लू असून साधरण १ ते दीड वर्षांचे ते असावे असा अंदाज तिने बांधला आहे. पाच सहा दिवसांपूर्वी या व्हेलचा मृत्यू झाला असावा असेही तिने म्हटले आहे. त्यानंतर तिचा मृतदेह वाहत येथे आल्याचे तिने सांगितले.
whale2
या माशाचे छायाचित्र माराजो बेटावर काम करत असलेल्या बिचो डी आगुआ इन्स्टिट्यूट या स्वयंसेवी संस्थेने जारी केले आहे. संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षापूर्वी हा मासा खूप लहान होता. एका वर्षातच तो ३६ फूट लांबीचा झाला.