तुम्ही पाहिला आहे का ‘बदला’मधील हा लुक !

amitabh-bacchan
सुजॉय घोष दिग्दर्शित ‘बदला’या चित्रपटात बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या भूमिका असून नुकतेच या चित्रपटातील अमिताभ यांचा करारी लूक असलेले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

यापूर्वी ‘बदला’ या चित्रपटाचे दोन पोस्टर रिलीज करण्यात आली होती. अमिताभ आणि तापसी यांची छबी असलेली ही दोन स्वतंत्र पोस्टर होती. या दोन्ही पोस्टर्सवर ”माफ कर देना हर बार सही नही होता” अशी कॅप्शन देण्यात आली होती.


ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर हे नवे पोस्टर रिलीज केले आहे. गौरी खान, सुनिर खेत्रपाल आणि अक्षय पुरी यांनी ‘बदला’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट येत्या ८ मार्च रोजी रिलीज होणार आहे.