भन्साळींसाठी स्क्रिन शेअर करणार प्रियंका-सलमान!

salman-khan
तब्बल १९ वर्षांनंतर सलमान खान आणि बॉलिवूडचे आघाडीचे दिग्दर्शक संजय लिला भन्साळी एकत्र काम करणार आहे. सलमान खान भन्साळींच्या आगामी चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची अधिकृत घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. सलमानने भन्साळींसोबत सावरियां चित्रपटात शेवटचे काम केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत सोनम कपूर आणि रणबीर कपूर या जोडी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर या जोडीने एकत्र काम करण्याचा योग कधी जुळून आला नाही. सलमानचे नाव चित्रपटासाठी निश्चित झाल्यानंतर भन्साळी आता चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी प्रियंका चोप्राच्या नावाचा विचार करत आहेत.

प्रियंकाने एका कार्यक्रमात भन्साळींशी चित्रपटासंदर्भात बोलणे चालू असल्याचे मान्य केले. अवघ्या बॉलीवूडला प्रियंका-सलमानमधील भारत चित्रपटानंतर सुरु असलेला वाद माहित आहे. ‘भारत’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू व्हायला अवघे १० दिवस बाकी असताना प्रियंकाने चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता. त्यानंतर भाईजानाच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली होती. तिच्या अव्यवहारिक वागण्याबद्दल सलमानने एका कार्यक्रमात उघडपणे आपली नाराजी बोलूनही दाखवली होती. तर दुसरीकडे सलमानने प्रियंकासोबत कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला असल्याच्या चर्चाही होत्या. आता या दोघांमधला वाद मिटवून त्यांना एकत्र आणण्यास भन्साळी यशस्वी होतात का हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

Leave a Comment