कराकुल लेक- जगातील मोठे मृत सरोवर

kakraku
जगाचे छत म्हटले जात असलेल्या मध्य आशियातील पामीर पठारावर, उंच पहाड रांगामध्ये समुद्र सपाटी पासून ४ हजार मीटर उंचीवर असलेले कराकुल सरोवर हे जगातील मोठे मृत सरोवर आहे. दीड कोटी वर्षांपूर्वी उल्कापिंड येथे पडल्याने हे सरोवर निर्माण झाल्याचे भूशास्त्रज्ञ म्हणतात. या सरोवराची व्याप्ती ३८० चौरस किमी इतकी प्रचंड असून खोली आहे २३० मीटर. चारी बाजूनी बर्फाचे डोंगर आणि वाळवंटानी घेरलेल्या या सरोवराच्या भेटीस जायचे असेल तर पामीर हायवेवरून जावे लागते.

karakul
ब्रिटीश लोकांनी प्रथम या सरोवराचे नामकरण राणी व्हिक्टोरिया वरून महाराणी व्हिक्टोरिया सरोवर असे केले होते मात्र रशियाने हे नवा कराकुल म्हणजे काळे सरोवर असे केले. हे खाऱ्या पाण्याचे सरोवर असून या पाण्यात इतके क्षार आहेत कि त्यात फक्त स्टोन लोच नावाचे विशेष मासे जिवंत राहू शकतात. बाकी कोणतेही मासे यात जगू शकत नाहीत. मात्र या सरोवराकाठी तिबेटी फुलपाखरे, ससाणे दिसतात. या पाण्याची घनता इतकी जादा आहे कि त्यात नाव चालविणे अशक्य होते. बळजबरी नाव घातली तर ती उलटते.

zeel
हे पाणी दिवसातून अनेकदा रंग बदलते आणि तेच या सरोवराचे खरे सौंदर्य आहे. दिवसा ते कधी निळे, कधी पाचुसारखे हिरवे तर कधी समुद्री हिरवे दिसते. सायंकाळी मात्र हे पाणी काळे दिसते. आशियातील हे सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. उन्हाळ्यात येथे प्रचंड उन असते तर थंडीच्या दिवसात हाडे गोठवणारी थंडी असते. तरीही अनेक पर्यटक बिकट वाट पार करून येथे उन्हाळ्यात येतात. या काळात येथे उत्सवी वातावरण असते. सरोवराजवळ लोकवस्ती जवळजवळ नाही. फक्त कराकुल नावाचे छोटेसे खेडे आहे.

Leave a Comment