शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युवकाने पाठीवर गोंदवली शहीदांची नावे

tattoo
बिकानेर – मागच्या आठवड्यात जम्मू-काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यात 40 हून अधिक जवानांना वीरमरण आले. त्यांना देशभरातील नागरिक आप-आपल्या पद्धतीने श्रद्धांजली वाहत आहेत.
tattoo1
अशातच आता राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील येथील श्रीडूंगरगड तालुक्यात राहणारा एक गावकरी गोपाल सारण सध्या चर्चेत आहे. आपल्या पाठीवर गोपालने एकूणच 71 शहीदांची नावे गोंदवली. त्यामध्ये पुलवामा दहशतवादी हल्ला आणि चकमकीत हुतात्मा झालेल्या 42 जवानांच्या नावांचा समावेश आहे. उर्वरीत सर्वच शहीद जवान हे बिकानेर आणि रतनगड येथील निवासी होते. यासोबतच गोपालने पाठीवर तिरंग्याचा टॅटू सुद्धा कोरला आहे. बिकानेरमध्ये शहीद स्मारक नाही यावर सुद्धा गोपालने खंत व्यक्त केली आहे.