झामॅटोची बिर्याणी पडली चक्क 50 हजार रुपयांना!

zomato
ऑनलाईन बिर्याणी ऑर्डर करणे एवढे महागात पडले की त्याच्या बँक खात्यातून 4,99,997 रुपये कापले गेले. ते सुद्धा तो ऑर्डर रद्द करण्याचा प्रयत्न करीत असताना. त्याच्या बँक खात्यातून तीन वेळा मोठे ट्रांझेक्शन करत मोठी रक्कम काढण्यात आली.
zomato2
खरतर निशांत राज नावाचा एक तरुण बिहारहून बंगाल फिरण्यासाठी आला होतो. तो तेथे आपल्या एका ओळखीच्या नातेवाईकाकडे थांबला होता. तो नातेवाईकाच्या घरी पोहचण्याच्या आधीच ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या झोमॅटोने त्याच्या नातेवाईकाच्या घरी बिर्याणी पोहचवली होती, पण घरी पोहचल्यानंतर त्याला घरी जेवण तयार असल्याचे दिसल्यानंतर त्याने आपली ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी झोमॅटोचा कस्टमर केअर नंबर गुगलवर शोधला.
zomato1
निशांतचे असे म्हणने आहे की, त्याला कस्टमर केअरकडून रद्द ऑर्डरचे पैसे त्याच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येतील त्यासाठी एक अॅप डाऊनलोड करावे लागेल. कस्टमर केअरने सांगितल्याप्रमाणे त्याने अॅप डाऊनलोड केल्यानंतर अचानक त्याच्या मोबाईलवर मेसेज येण्यास सुरुवात झाली.
zomato3
थोड्याच वेळात त्याच्या बँक खात्यातून तीन वेळेस 19999, 19999 आणि 9999 रुपये काढण्यात आल्याचा मेसेज आला. दरम्यान निशांतला आपली फसवणूक झाल्याचा संशय आल्यानंतर त्याने तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेला असता पोलीसांनी त्याची तक्रार सायबर क्राईम अंतर्गत नोंदविण्यात आली आहे.

Leave a Comment